
श्रीमती संपतबेन पुनमचंदजी बाफना प्राथमिक शाळा व कमल केशव राऊत बालविद्या मंदिर
मुख्याध्यापिकांचा संदेश
2003 साली स्थापन झालेला आमचा बालवाडी व प्राथमिक विभाग आज गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल परंपरा यासाठी ओळखला जातो. गेल्या 22 वर्षांपासून विद्यार्थ्यांची प्रगती आणि पालकांचा विश्वास हेच आमच्या कार्याचे प्रेरणास्रोत आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेल्या कौशल्यांची जाणीव करून देणे, शिक्षणाची गोडी वाढविणे आणि आनंदी वातावरणात सर्वांगीण विकास घडविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. नियमित अध्यापनासोबत सण-उत्सव, विविध स्पर्धा, आंतरशालेय उपक्रम, तसेच मंथन परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा यांसारख्या शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी आयोजित केल्या जातात.
ई-लर्निंग, इंटरॅक्टिव्ह बोर्ड यांसारख्या आधुनिक तंत्रसुविधा आणि तबलावादनासारखे उपक्रम विनामूल्य उपलब्ध करून देत आम्ही शिक्षण अधिक प्रभावी बनवत आहोत.
आज पावणे सातशे विद्यार्थी आमच्या विभागात शिक्षण घेत आहेत आणि पुढील वर्षी ही संख्या 1000 वर नेण्याचा आमचा संकल्प आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचे संपूर्ण शिक्षकवर्ग मनोभावे कार्यरत आहे.
– मुख्याध्यापिका
प्राथमिक विभाग
दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट
